मालवण, दि प्रतिनिधी :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मालवण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, मालवण प्रखंडाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या स्मृतीस वंदन केले. या अभिवादन कार्यक्रमाला भाऊ सामंत, विलास हडकर, हरेश पडते, अनिकेत फाटक, श्रीराज बादेकर व गणेश चव्हाण हे उपस्थित होते.
देशाच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेबांचे योगदान अमूल्य असून त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.







