मालवण (प्रतिनिधी)
तारकर्ली येथील वायरी बांध परिसरातील जुने दत्त मंदिर येथे अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून दि. १९ एप्रिल रोजी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत विविध भागांतील नृत्यप्रेमींना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून, स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे. विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी रु. ३५०० व चषक, द्वितीय क्रमांकासाठी रु. २५०० व चषक, तृतीय क्रमांकासाठी रु. १५०० व चषक, तसेच उत्तेजनार्थ रु. १००० व चषक आणि इतर चार चषक देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सहभागासाठी इच्छुकांनी नाना नाटळकर (९९२३६४१८७९) किंवा हेमंत सावंत (८२७५७९६९६४) यांच्याशी संपर्क साधावा.






