मालवण (प्रतिनिधी)
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यात १९ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक शिवजन्मोत्सवानिमित्त रिल्स बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा खुल्या वयोगटासाठी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे.
रिल्स स्पर्धा दोन टप्यात होणार असून पहिल्या टप्प्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज – युवकांचे प्रेरणास्थान हा विषय असून या टप्प्यातील रील दि. १५ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अपलोड करावे तर दुसऱ्या टप्प्यासाठी शिवप्रभुंची शिवलंका – सिंधुदुर्ग किल्ला हा विषय असून रील दि. १८ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अपलोड करावे. दूसऱ्या टप्प्यातील रिल सिंधुदुर्ग किल्ल्यावर जावून चित्रीत केलेले असावे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचाच स्पर्धेतील क्रमांकासाठी विचार केला जाईल. रील्स अपलोड करताना paramparik shivjanmotsav_kille sindhudurg या इन्स्टाग्राम फॉलो व कोलॅब करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्र.- रु. ६००० (नूर्वी हेमराज सावजी पुरस्कृत), द्वितीय क्र. – ४००० (अमित जयप्रकाश वाक्कर पुरस्कृत), तृतीय क्र. – ३००० (हेमंत रामाडे पुरस्कृत) उत्तेजनार्थ प्रत्येकी २ बक्षिसे – रु. १००० (ललित चव्हाण पुरस्कृत) अशी पारितोषिके देण्यात येतील. बक्षीस वितरण समारंभ दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १० वा. किल्ले सिंधुदुर्ग – शिवराजेश्वर मंदिर येथे पारंपारिक शिवजन्मोत्सव कार्यक्रमात होईल.
अधिक माहितीसाठी श्रीराज बादेकर – ७०२०९८८१३२, मोरेश्वर गोसावी- ७०८३२२६०८८, भुषण मेतर- ९१५८९५३९०६, प्रविण पवार- ७५८८९०३१७४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.






