मालवण (प्रतिनिधी)
भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांनी मालवण च्या समुद्रात उभारलेल्या व अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को संस्थेने जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरविलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा
वर्धापनदिन किल्ले प्रेरणोत्सवं समितीकडून दरवर्षी ‘प्रेरणोत्सव” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५९ वा वर्धापन दिन दि. २ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमानी साजरा केला जाणार आहे.
किल्ले सिंधुदुर्गच्या प्रेरणात्सव कार्यक्रमास यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ६
वा. मोरयाचा धोंडा येथे नगराध्यक्ष वराडकर यांच्या हस्ते मोरेश्वर पूजन, सकाळी १० वा. सिंधुदुर्ग किल्ला येथील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन, ११.३० वा. किल्ला येथे मर्दानी खेळांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीने केले आहे.







