मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुका नाभिक संघटनेची २३ मार्च रोजी आयोजित केलेली सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आली असून हि सभा दि. ३० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता भैरवी मंदिर, बाजारपेठ मालवण येथे होणार आहे.
तरी या सभेस सर्व नाभिक बांधव, महिला तसेच सलून व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. तालुका कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, विभागप्रमुख व गट प्रमुख यांनीही उपस्थित राहवे. सर्व सलून व्यावसायिकांपर्यंत सभेची माहिती पोहोचवावी, असेही आवाहन तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण व सचिव कांता चव्हाण यांनी केले आहे







