मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘परब मेडिकल’चे उद्घाटन मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
यावेळी मालवण पंचायत समितीचे उपसभापती घनश्याम झाड, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेविका अनिता गिरकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, कुंभारमाठचे माजी सरपंच गणपत सावंत, विश्व हिंदू परिषद मालवणचे अध्यक्ष भाऊ सामंत, मालवणी बाजार अध्यक्ष प्रमोद मोहिते, तसेच पी.जी. पाटील, बाळू अंधारी, सच्चिदानंद वस्त, जय वस्त, सुधीर वस्त, सचिन पाटकर, शेखर गावडे, श्रीकृष्ण तळवडेकर, बबन गावकर व परब कुटुंबीय उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही भेट देत परब कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक सहकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून नव्या उपक्रमासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
मालवण शहरातील नागरिकांना औषध सेवा अधिक सुलभ होण्यासाठी ‘परब मेडिकल’ उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.







