सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे लायन्स क्लबच्या वतीने दै. रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार भूषण मेतर यांचा पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. समाजातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडून पत्रकारितेत केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
या कार्यक्रमात लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले यांच्या हस्ते भूषण मेतर यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेचे समाजातील महत्त्व अधोरेखित करत भूषण मेतर यांच्या कार्याचे कौतुक केले. विविध सामाजिक, स्थानिक आणि जनहिताच्या विषयांना माध्यमातून न्याय देत त्यांनी पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या सत्कार प्रसंगी लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते.







