मालवण (प्रतिनिधी)
मालवण नगरपालिकेचे मागासवर्गीय कल्याण समिती सभापती व नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांनी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांची भेट घेतली. या भेटीत समाज कल्याणच्या माध्यमातून मालवण शहरात राबवायच्या योजना व उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मालवण शहरात विविध योजना उपक्रम राबवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाज कल्याण मार्फत सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांना दिली.
यावेळी समाज कल्याणचे अधिकारी तुषार गवळी, लिपिक संतोष परुळेकर, समतादूत संग्राम कासले आदी उपस्थित होते.







