मालवण दि प्रतिनिधी
आज निसर्गाच्या बदलत्या स्वरूपामुळे सिंधुदुर्गातील आ़बा, काजू व्यावसायिक शेतकरी, बागायतदार तसेच कराराने बागा घेणारे छोटे मोठे व्यवसायिक पुर्णपणे हतबल झालेले असून या व्यवसायिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी
गूरूवार दि १२ मार्चला होणाऱ्या आंबा- काजू बागायतदार आणि व्यावसायिक, व्यापारी यांच्या संयुक्त मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सर्व व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित सिंधुदुर्ग या संस्थेचे संचालक तथा वायरी येथील आंबा व्यावसायिक श्री आप्पा चव्हाण यानी केले आहे..
प्रसिद्धी पत्रकात श्री चव्हाण यांनी म्हटले आहे की, हे आंदोलन सरकारच्या विरोधात नसुन आंबा ,काजू या व्यावसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या सर्व प्रकारच्या कुटुंबावर ओढवलेली नैसर्गिक आपत्ती आहे त्यावर मायबाप महाराष्ट्र शासनाकडून त्यांना जीवदान देण्याऐवजी दुर्लक्ष करीत केवळ हिरव्या -भगव्यावर राजनिती केली जात आहे काही सर्वपक्षीय आमदार याविषयावर चर्चा करण्यासाठी बोलत असताना त्यांना रोखून , काही वेळा वेळ मारून नेण्याचा प्रकार घडत आहे तर काही जबाबदार नेत्यांकडून आंदोलनाचा फेरविचार करण्याचा सल्ला देऊन सबुरीचा प्रयत्न चालू आहे अशा रितीने शासनकर्त्यांची मनमानी , हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी “आर या पार ची “रस्त्यावरची लढाई आता लढावीच लागणार आहे असे मत व्यक्त केले आहे
आज सरकारचे निर्णय हे जनतेच्या कल्याणासाठी असणे गरजेचे आहे परंतू सरकारला कृषी खात्याकडून ९० टक्के आंबा उत्पादन घटले असल्याचा अहवाल प्राप्त होऊनही शासनकर्ते “मांजर बनून मडक्यात डोकं घालून दुध पिण्यासारखे ” वागत आहेत सर्वसामान्य आंबा बागायतदार आणि कराराने आंबा बागा घेवुन व्यवसाय करणारे व्यावसायिकांचे हे आंदोलन फक्त सरकार तात्काळ नुकसान भरपाई साठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करून थांबवू शकते मात्र फुकाचे सल्ले देवून ,शांततेत चाललेले आंदोलन पोलीसांकरवी मुस्कटदाबी करून थांबवू शकत नाही तसे झाल्यास मात्र होणाऱ्या परिणामांस शासनकर्तेच जबाबदार रहातील..असा इशाराही आप्पा चव्हाण यांनी दिला आहे.
ओरोस येथे होणारे हे आंदोलन शेतकरी,कष्टकऱ्यांचे एक निर्भिड नेतृत्व अशी त्यांची ओळख असणारे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणार असून पक्षभेद बाजूला ठेवून सर्व नेतेमंडळींनी व लोकप्रतिनिधीनी या आंदोलनातं सहभागी व्हावे या आंदोलनासाठी जाण्यासाठी मालवण तालुक्यातील आंबा ,काजू व्यावसायिकांनी १२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता आपापल्या वाहनांनी मालवण एसटी स्टँड येथे वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही श्री आपा चव्हाण यांनी केले आहे






