मालवण : शहरातील ग्राहकांसाठी सोयीची सेवा म्हणून ऑर्बिट मार्टतर्फे ऑनलाइन खरेदी व घरपोच डिलिव्हरी सेवा आज, दि. ६ मार्चपासून मालवणमध्ये सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे नागरिकांना आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून विविध वस्तू घरबसल्या ऑर्डर करून थेट घरपोच मिळणार आहेत.
ऑर्बिट मार्टच्या ॲपद्वारे रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ, किराणा सामान, फळे-भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, केक-पेस्ट्री, बेकरी पदार्थ, अंडी-मासे-चिकन-मटण, औषधे तसेच पाळीव प्राण्यांचे खाद्य अशा अनेक वस्तू सहजपणे ऑर्डर करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना बाजारात जाण्याची गरज न पडता घरबसल्या खरेदीचा लाभ मिळणार आहे.
ही सेवा मालवण पिनकोड ४१६६०६ या परिसरात उपलब्ध असून नागरिकांनी ऑर्बिट मार्टचे मोबाईल ॲप डाउनलोड करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑर्डर देण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ९५११९६९७०९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
ग्राहकांनी खालील लिंकद्वारे ॲप डाउनलोड करू शकतात –
Android App: https://play.google.com/store/apps/details?id=com.orbitmart.gogrocer
Website: https://orbitmart.co.in/
या नव्या सेवेमुळे मालवणमधील नागरिकांना जलद व सोयीस्कर ऑनलाइन खरेदी आणि होम डिलिव्हरीचा लाभ मिळणार असल्याचे ऑर्बिट मार्टतर्फे सांगण्यात आले आहे.







