सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी व समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचून त्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी या उद्देशाने माहे मार्च महिन्यातील लोकशाही दिन सोमवार दि. २ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा लोकशाही दिन दुपारी १.०० ते २.०० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील मायनाक भंडारी सभागृह येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या तक्रारी, निवेदने व विविध प्रशासकीय समस्या संबंधित कागदपत्रांसह लोकशाही दिनात उपस्थित राहून मांडाव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.







