मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील धुरीवाडा–कुरण येथील श्री स्वामी समर्थ मठ धुरीवाडा येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा एकोणिसावा वर्धापन दिन सोहळा सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी भक्तिभावात साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळी अभिषेक, पूजन व नामस्मरणाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीभक्त रवींद्र मनोहर सारंग व सौ. रविना रवींद्र सारंग यांच्या हस्ते श्री सत्यदत्ताची महापूजा होणार आहे.
दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम
दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन असून दुपारी १ वाजल्यापासून तीर्थप्रसाद वितरण केले जाणार आहे. सायंकाळी ‘त्रिमूर्ती भक्तिसंगम, मालवण’ यांचे सुश्राव्य गायन होईल. तसेच सद्गुरु वामनराव पै, जीवन विद्या मिशन कोळंब यांचा हरिपाठ तसेच श्री सद्गुरु संदानंद माऊली संप्रदाय भजन मंडळ, वायरी यांचे भजन होणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकरी – धामापूरकर कुटुंबीय यांनी केले आहे.







