A blood donation and free health check-up camp was organized in Vaibhavwadi on 14 February 2026 in memory of Late Shila Bandivdekar. Shruti Sutar was felicitated by Padma Shri Parshuram Gangawane during the event.
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
कै. सौ. शिला शंतनू बांदिवकडेकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वैभववाडी येथे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन विभाग – सिंधुदुर्ग, एकदंत फूड अँड बेवरेजेस (ओरबेलो) आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
रक्तदान व आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिबिरात विविध तज्ञ डॉक्टर व परिचारिकांनी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली. रक्तदान शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कु. श्रुती सुतारचा विशेष सन्मान
या कार्यक्रमात उत्कृष्ट चित्रकार व दशावतारी नाट्य कलावंत म्हणून कु. श्रुती संतोष सुतार हिला पद्मश्री पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलावंत परशुराम पद्मश्री गंगावणे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला पंचायत समिती वैभववाडीचे सभापती बापी मांजरेकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, तसेच मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. सामाजिक एकात्मता आणि सेवाभाव जपणारा हा उपक्रम वैभववाडी परिसरात कौतुकाचा विषय ठरला.








