मालवण | प्रतिनिधी
“आपण जनतेचे सेवक आहोत या भावनेतून मतदारसंघात विकासकामे करून जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी लावला पाहिजे,” असे प्रतिपादन दत्ता सामंत यांनी पोईप येथे केले.
मालवण तालुक्यातील पोईप येथील सौ. इं. द. वर्दम हायस्कूलसाठी खासदार नारायण राणे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सहा वर्गखोल्यांचे भूमिपूजन तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोईप वर्दम हायस्कूल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कांदळकर होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती सुमेधा पाताडे, संतोष साठविलकर, अक्षता राजन गावडे, संजय उर्फ छोटू ठाकूर, प्रज्ञा चव्हाण, संतोष गावडे यांच्यासह मालवण तालुका प्रमुख मंदार लुडबे, तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम, पोईपचे सरपंच श्रीधर नाईक, तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते.
विजेत्या सदस्यांचा गौरव
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या सुकळवाड मतदारसंघातील जि.प. सदस्या सौ. सुमेधा संतोष पाताडे, पं.स. सदस्या सौ. प्रज्ञा भाऊ चव्हाण, पेंडूर जि.प. मतदारसंघातील सदस्य संतोष साठविलकर, सुकळवाड पं.स. सदस्य संतोष दत्तात्रय गावडे, वायरी भूतनाथ सदस्या सौ. अक्षता राजन गावडे तसेच मसुरे पं.स. सदस्य संजय उर्फ छोटू ठाकूर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्दम हायस्कूलच्या दहावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभही मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. विकासकामांबरोबरच शैक्षणिक प्रगतीला प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे पोईप परिसरात विकासाच्या कामांना गती मिळणार असून शिक्षण क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.







