Prize distribution ceremony of the Reels Competition organized by Vishwa Hindu Parishad and Bajrang Dal Sindhudurg held with dignitaries and award winners.
सिंधुदुर्ग: विश्व हिंदू परिषद व बजरंग दल सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रील्स स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विश्व हिंदू परिषद प्रदेश मंत्री मोहन साळेकर यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक संकेत हसोळकर व त्यांच्या टीमने पटकावले. त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय पारितोषिक सोलकढी साऊथची या टीमने मिळवले असून त्यांनाही रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तृतीय पारितोषिक ऋग्वेद केरकर व त्यांच्या टीमने पटकावले.
वैयक्तिक श्रेणीतील पुरस्कार पुढीलप्रमाणे देण्यात आले –
उत्कृष्ट अभिनेता: मकरंद मयेकर,
उत्कृष्ट अभिनेत्री: अनुषा पिलई
उत्कृष्ट बाल कलाकार: विघ्नेश विशाल मसुरकर,
उत्कृष्ट लेखन: ‘स्वर्गातलो कोकण’,
उत्कृष्ट दिग्दर्शन: ‘हापूस गँग’,
निर्मिती नियोजन: सिद्धेश चव्हाण.
याशिवाय महिला विशेष पुरस्कार ‘स्त्री शक्तीचा सन्मान’ अंतर्गत अरूश्री सावंत, मथुरा सावंत, संगीता सावंत, शीतल मसुरकर, अनुषा पिळाई, रीना मराळ व मीनाक्षी सावंत भोसले यांना विशेष पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
तसेच, समाजकार्य व उपक्रमांमध्ये सहकार्याबद्दल जुबेर खान यांचा ‘धर्मरक्षक मित्र’ म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.







