मालवण नगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 3 देऊळवाडा मतदारसंघात उमेदवार दिपक गणपत पाटकर यांच्या प्रचाराला अभूतपूर्व आणि उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन दिवसांत घेतलेल्या पहिल्या प्रचारफेरीत शेकडो नागरिकांच्या उपस्थितीने परिसर दणाणून गेला.
प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला उत्साह पाहता जनतेचा कौल स्पष्ट असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दिपक पाटकर यांना “कार्यसम्राट” आणि “लोकप्रिय उमेदवार” म्हणून मिळत असलेला गौरव या फेरीत अधिक ठळक जाणवला. घराघरांत भेटी, स्थानिकांशी संवाद, विकासाच्या आश्वासनांवर चर्चा अशा माध्यमातून प्रचार फेरी विशेष लक्षवेधी ठरली.
नागरिकांकडून विकासाभिमुख नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त होत असून, प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणुकीची हवा हळूहळू तापू लागली आहे. दिपक पाटकर यांच्या प्रचाराच्या या दमदार सुरुवातीमुळे आगामी दिवसांत निवडणूक अधिक रंगत जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.








