२०२६ हे वर्ष क्रीडा रसिकांसाठी विशेष ठरणार आहे. यंदा जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी सर्वात मोठी आणि उत्सुकतेची स्पर्धा म्हणजे फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६. या स्पर्धेत पहिल्यांदाच ४८ संघ सहभागी होणार असून, १२ जून ते २६ जुलै २०२६ या कालावधीत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये फुटबॉलचा थरार रंगणार आहे. विस्तारित स्वरूपातील वर्ल्ड कपमुळे अधिक सामने, अधिक देशांचा सहभाग आणि अधिक रोमांचक क्षण अनुभवायला मिळणार आहेत.
टेनिसमध्ये वर्षाची सुरुवात पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनने होणार आहे. त्यानंतर भारतासाठी महत्त्वाचा ठरणारा डेव्हिस कप क्वालिफायर्स बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. टेबल टेनिसमध्ये चेन्नई येथे WTT स्टार कंटेंडर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, भारतीय खेळाडूंना घरच्या मैदानावर चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे.
याशिवाय शूटिंग, स्क्वॉश, वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, हॉकी, अॅथलेटिक्स, गोल्फ यांसारख्या अनेक खेळांच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०२६ मध्ये पार पडणार आहेत. त्यामुळे हे वर्ष खेळाडूंसह क्रीडा रसिकांसाठीही आठवणीत राहणारे ठरणार आहे.
२०२६ मधील प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा
कॉमनवेल्थ गेम्स
ठिकाण: ग्लासगो
कालावधी: २३ जुलै ते २ ऑगस्ट २०२६
एशियन गेम्स
ठिकाण: जपान
कालावधी: १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६
फुटबॉल
फिफा वर्ल्ड कप २०२६
कालावधी: १२ जून ते २६ जुलै २०२६
यजमान देश: अमेरिका, कॅनडा, मेक्सिको
(पहिल्यांदाच ४८ संघांचा सहभाग)
टेनिस स्पर्धा २०२६
ऑस्ट्रेलियन ओपन – १२ जानेवारी ते १ फेब्रुवारी
फ्रेंच ओपन – मे ते जून
विंबल्डन – जून ते जुलै
यूएस ओपन – ऑगस्ट ते सप्टेंबर
ATP फायनल्स – नोव्हेंबर
अॅथलेटिक्स
दोहा डायमंड लीग – मे २०२६
नॅशनल ओपन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप – ऑक्टोबर २०२६ (नवी दिल्ली)
बॅडमिंटन
BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप – जुलै २०२६
सैयद मोदी इंडिया इंटरनॅशनल सुपर 300 – नोव्हेंबर २०२६ (लखनौ)
गुवाहाटी मास्टर्स – डिसेंबर २०२६
ओडिशा मास्टर्स – डिसेंबर २०२६
हॉकी
FIH प्रो लीग – फेब्रुवारी ते मार्च २०२६
FIH हॉकी वर्ल्ड कप – ऑगस्ट २०२६
इतर क्रीडा स्पर्धा
एशियन रायफल/पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप – फेब्रुवारी २०२६
शूटिंग लीग ऑफ इंडिया – फेब्रुवारी ते मार्च २०२६ (नवी दिल्ली)
इंडियन ओपन स्क्वॉश – मार्च २०२६
इंडियन ओपन गोल्फ – मार्च २०२६
एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप – एप्रिल २०२६ (अहमदाबाद)
फुटबॉल वर्ल्ड कपपासून ते ऑलिम्पिकसदृश बहुराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत, २०२६ हे वर्ष क्रीडा जगतातील थरार, संघर्ष आणि यशोगाथांनी भरलेले ठरणार आहे.






