मालवण (प्रतिनिधी) : यंदाच्या वर्षीही कोंकण एक्स्ट्रीम अँगलर्स यांच्या वतीने दिनांक २० व २१ डिसेंबर रोजी तोंडवळी तळाशिल समुद्र किनाऱ्यावर भव्य “सर्फ फिशिंग” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून १२० हून अधिक अँगलर्स या स्पर्धेत सहभागी झाले असून, रील व रॉडच्या सहाय्याने गळाने मासे पकडण्याच्या कौशल्याची ही स्पर्धा आहे.
स्पर्धा एकूण तीन सत्रांमध्ये खेळवली जाणार आहे. दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या दोन सत्रांत, तर दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी १ या सत्रात स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेत पकडलेल्या मास्यांच्या प्रजातींनुसार गुणांकन करण्यात येणार असून, मास्याची लांबी मोजून त्यानुसार गुण (पॉईंट्स) संबंधित स्पर्धकाला देण्यात येणार आहेत. या गुणांच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
दि. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम पारितोषिक – रोख ५०,००० रुपये, ट्रॉफी व टॅकल्स द्वितीय पारितोषिक – रोख ४०,००० रुपये, ट्रॉफी व टॅकल्स तृतीय पारितोषिक – रोख ३०,००० रुपये, ट्रॉफी व टॅकल्स
याशिवाय पहिला कॅच, जास्त कॅच, तसेच महिला स्पर्धकांसाठी विशेष बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेमुळे कोकणातील सर्फ फिशिंगला चालना मिळत असून, साहसी खेळप्रेमी अँगलर्ससाठी ही स्पर्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
या स्पर्धेचे एक्सक्लुझिव्ह प्राईज स्पॉन्सर म्हणून Morvekar Realtors यांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच टॅकल स्पॉन्सर्स म्हणून C&C, Halco, Lakshmi Tackles (Penn, Owner, Berkely, Mustad), Bone Fishing, ATC, Cassan, Scaless, Uzzo, Coastal Fishing (Gfin) आणि Murvvy यांचा समावेश आहे.
Associate Sponsor म्हणून Omkar Puf Insulation Pvt. Ltd. तरEnergy Drink Partner म्हणून RIO Boom Energy Drink आणिHydration Partner म्हणून INFLUX यांनी पाठिंबा दिला आहे.
या स्पर्धेच्या प्रचार-प्रसारासाठी Media Partners म्हणून Malvani Life, Amol Sawant Vlogs, We Wild Explorer, Cast Master, Mandar Shetye आणि Konkani Life सहभागी झाले आहेत.Style Partner म्हणून Crafty Angler Jersey India तर Hospitality Partners म्हणून Aryavarta Beach Resort (Bhogwe), Banyan Tree Holidays आणि Tarkarli Sea Homes यांचे सहकार्य लाभले आहे.
याशिवाय Event Partners म्हणून Vinaayak Fishing Tackles (Goa), Fishon Tackle Store (Alibag) आणि Opensea Fishing Tackles (Navi Mumbai) सहभागी झाले आहेत.
Konkan Xtreme Anglers तर्फे सर्व प्रायोजक व भागीदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून, त्यांच्या विश्वासामुळे भारतातील मासेमारी संस्कृतीला नवे व्यासपीठ मिळत असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.







