डीएमएफ हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या वतीने कार्यरत असलेल्या डॉ. रिया जैन आठवले यांना संयुक्त राष्ट्रांच्या United Nations Global Compact Network India (UN-GCNI) आयोजित Business Conclave मध्ये Esteemed Faculty & Guest Speaker म्हणून आमंत्रित होण्याचा मान मिळाला आहे. ही परिषद मुंबईतील मुंबई क्रिकेट असोसिएशन कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे पार पडली.
या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत डॉ. रिया यांनी “Healthcare & Supply Chains” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रभावी व परिणामकारक सत्र सादर केले. देशातील आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकता, नैतिक खरेदी प्रक्रिया, रुग्णकेंद्रित निर्णयप्रक्रिया तसेच पुरवठा साखळीतील प्रामाणिकता व उत्तरदायित्व यांचे महत्त्व त्यांनी सखोल आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने उपस्थितांपुढे मांडले.
या कार्यक्रमाला भारतासह विविध देशांतील नामवंत तज्ज्ञ, उद्योजक आणि प्रतिनिधी उपस्थित होते. विविध राष्ट्रांतील वक्त्यांसोबत भारताचे औपचारिक प्रतिनिधित्व करत डॉ. रिया जैन आठवले यांनी आरोग्य व पुरवठा साखळी विषयक एका महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय दस्तऐवजावर स्वाक्षरी करून देशाचे प्रतिनिधित्व अभिमानाने निभावले. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
व्यवसायाने Physician असलेल्या डॉ. रिया जैन आठवले सध्या देवगड मेडिकल फाउंडेशन येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र व विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.
या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी यशाबद्दल डीएमएफ हेल्थकेअर प्रा. लि. तसेच देवगड मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने डॉ. रिया जैन आठवले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.





