पास्कॉल पिंटो उपाध्यक्षपदी; संचालक मंडळाचीही बिनविरोध निवड
मालवण, दि. ७ (प्रतिनिधी) : रोझरी मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित, मालवणच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी रुजारिओ पिंटो यांची तिसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी पास्कॉल पिंटो यांची निवड झाली. अध्यक्ष व उपाध्यक्षांसह संचालक मंडळाची निवडही बिनविरोध पार पडली.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. संस्थेच्या संचालक मंडळावर रेजिनॉल्ड रॉड्रिक्स, रॉर्बट फर्नांडीस, सौ. बॅनी फर्नांडीस, सौ. ग्रासीन ऑगस्तीन डिसोजा, सौ. फिलोमिना पिंटो, ऑल्विना फ्रान्सिस मेंडोसा, सौ. डेन्सी डेनीस नरोन्हा, सौ. गायत्री गणपत मिठबावकर, गणपत मिठबावकर आणि सात्वादर मिरांडा यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
रुजारिओ पिंटो यांची अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याने संस्थेच्या सभासदांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. निवडीनंतर अध्यक्ष रुजारिओ पिंटो आणि उपाध्यक्ष पास्कॉल पिंटो यांचे संचालक मंडळ तसेच संस्थेच्या सदस्यांकडून अभिनंदन करण्यात आले.






