१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक
मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेत डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथील प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी योगेश राजन ताम्हणकर याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळविले.
श्री. संजय आग्रे मित्र मंडळ, फोंडाघाट यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कट्टा महाविद्यालयातील एकूण सहा विद्यार्थ्यांनी विविध मैदानी क्रीडा प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
योगेश ताम्हणकर याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला. त्याला स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक प्रा. कविटकर यांचे मार्गदर्शन लाभले.
योगेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






