MLA Nilesh Rane visited the residence of late Zilla Parishad former president Saroj Parab in Masura and offered condolences to her family following her demise due to a heart attack.
मालवण : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कै. सरोज परब यांच्या निधनाने परब कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी मसुरे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
कै. सरोज परब यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी असल्याचे सांगत आमदार निलेश राणे यांनी परब कुटुंबीयांना धीर दिला.
यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले, “सरोज ताईंच्या निधनाने आम्ही हक्काचा घरचा माणूस गमावला आहे. त्यांच्या निधनाची वार्ता खूप धक्कादायक आणि वेदनादायी होती. आम्ही सर्वजण परब कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.”
यावेळी आमदार निलेश राणे यांनी कै. सरोज परब यांचे पती शिवाजी परब, मुलगी व मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती पूनम चव्हाण तसेच मुलगा राहुल परब यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
या भेटीवेळी माजी आमदार राजन तेली, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र प्रभुदेसाई, बाळू कुबल, बाबा परब, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, महेश बागवे, शिवसेना संपर्कप्रमुख राजेश गावकर, किसन मांजरेकर, अशोक बागवे, पंढरीनाथ मसुरकर, तात्या हिंदळेकर, नागेश चव्हाण, गणेश परब, वैभव येसजी, अनिल सावंत, प्रवीण पेडणेकर आदी उपस्थित होते.







