MLA Nilesh Rane visits the family of late Sanmesh Parab and offers condolences following the tragic fishing boat accident in Malvan sea.
मालवण : प्रतिनिधी
मालवण समुद्रात मासेमारी नौका उलटून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू पावलेले मालवण दांडी येथील मच्छिमार नेते तथा भाजपा मालवण उपाध्यक्ष आणि नौका मालक कै. सन्मेष सुरेश परब यांच्या कुटुंबीयांची आमदार निलेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
मालवण समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील खडकाळ परिसरात मासेमारीसाठी गेलेली ‘सागरिका’ ही नौका मंगळवारी मोठ्या लाटांच्या तडाख्यात सापडून बुडाली होती. या दुर्घटनेत नौका मालक सन्मेष सुरेश परब यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी सन्मेष परब यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. सन्मेष परब यांच्या निधनाने मालवणच्या मच्छिमार समाजासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे.
यावेळी शिवसेना व भाजपा पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.







