MLA Nilesh Rane visits the family of late Akshay Rane and offers condolences following the tragic fishing boat accident in Malvan sea.
मालवण : प्रतिनिधी
मालवण समुद्रात मासेमारी नौका उलटून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू पावलेले खलाशी कै. अक्षय हनुमंत राणे यांच्या कुटुंबीयांची आमदार निलेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
मालवण समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील खडकाळ परिसरात मासेमारीसाठी गेलेली ‘सागरिका’ ही नौका मंगळवारी मोठ्या लाटांच्या तडाख्यात सापडून बुडाली होती. या दुर्घटनेत खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी सन्मेष परब आणि कै. अक्षय राणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत त्यांनी दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना व भाजपा पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कै. अक्षय राणे यांच्या कुटुंबीयांप्रती नागरिकांनीही संवेदना व्यक्त केल्या.







