मालवण, दि. प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. सरोज परब यांच्या निधनानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांनी मसुरे येथे परब कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
सरोज परब यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात्मक आणि राजकीय वाटचालीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नेहमी हसतमुख असणाऱ्या सरोजताईंची उणीव निश्चितच भासणार असून, या दुःखाच्या प्रसंगी आपण परब कुटुंबीयांसोबत असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
मसुरे येथील शिवाजी परब यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांनी सरोज परब यांचे पती शिवाजी परब, मुलगी तथा मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण आणि मुलगा राहुल परब यांचे सांत्वन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा परिषद सदस्य क्षमा हडकर, उपसभापती श्याम झाड, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस, डॉ. सुधीर मेहेंदळे, सूर्यकांत फणसेकर, महेश बागवे, महेश मांजरेकर, भाई मांजरेकर, संदीप हडकर, राजेश गावकर, पंढरीनाथ मसुरकर, जगदीश चव्हाण, अजय प्रभूगावकर, तात्या हिंदळेकर, नागेश चव्हाण, रोहेश गावकर, गणेश परब, पुरुषोत्तम शिंगरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.






