उपजिल्हाधिकारी शारदा पवार प्रमुख अतिथी; २५ ऑगस्टला कार्यक्रम
मालवण (प्रतिनिधी) : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी NSS उद्घाटन व उद्बोधन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयातील कै. नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास सिंधुदुर्गच्या उपजिल्हाधिकारी सौ. शारदा पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या पार्श्वभूमीवर नव्या शैक्षणिक वर्षातील NSS उपक्रमांना या कार्यक्रमातून प्रारंभ होणार आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, समाजातील विविध प्रश्न समजून घेऊन त्यावर विधायक पद्धतीने काम करावे, या उद्देशाने NSSच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
या कार्यक्रमास पत्रकार बंधू-भगिनी आणि माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे वृत्तांकन व प्रसिद्धी करावी, असे आवाहन NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी केले आहे.






