नारळी पौर्णिमेनिमित्त महायुतीचा उपक्रम; विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिकांसह चषक
मालवण, दि. प्रतिनिधी : नारळी पौर्णिमेनिमित्त भाजप-शिवसेना महायुतीच्या वतीने गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिर परिसरात भव्य ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम विजेत्यास जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब पुरस्कृत ७ हजार १ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी शिवसेना मालवण तालुका प्रमुख विनायक बाईत पुरस्कृत ४ हजार १ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी २ हजार १ रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी १ हजार १ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तृतीय व चतुर्थ क्रमांकाची पारितोषिके शिवसेना पदाधिकारी अभिमन्यू लाड यांनी पुरस्कृत केली आहेत.
या चारही विजेत्यांना आकर्षक चषकही देण्यात येणार असून, हे चषक शिवसेना युवासेना जिल्हाध्यक्ष संग्राम साळसकर यांनी पुरस्कृत केले आहेत.
स्पर्धेसाठी अलिबागचे प्रसिद्ध ‘नारळाचे बादशहा’ आसिफ भाई अलिबाग प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्पर्धेला रंगत येणार असून, नारळ लढविण्याच्या पारंपरिक क्रीडेचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी २६ ऑगस्टपूर्वी संतोष रमाकांत पारकर (मोबा. ७४९८३९३०४१) किंवा योगेश राजन लाड (मोबा. ८०१००५२९८३) यांच्याशी संपर्क साधून नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.






