केदार झाड मित्रमंडळाचा उपक्रम; स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण (प्रतिनिधी) : केदार झाड मित्रमंडळाच्या वतीने वायरी भूतनाथ मंदिर प्रांगणात पारंपरिक ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कोचरा येथील निलेश घाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. स्पर्धेला नागरिक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन दाजी सावजी, देवानंद लोकेगावकर, श्याम झाड, केदार झाड, मिलिंद झाड आणि संदीप बोडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. दिवसभर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यांनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी किसन मांजरेकर आणि विश्वास गावकर उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाचे विजेते निलेश घाडी यांना ११ हजार १११ रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाचे निलेश परब (कातवड) यांना ७ हजार ७७७ रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकाचे आकाश तळगावकर (वायरी) आणि चतुर्थ क्रमांकाचे हर्षद तळवडेकर (वायरी) यांना प्रत्येकी १ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पंच म्हणून प्रसन्न तळवडेकर, भूषण आचरेकर, अमित झाड आणि मुकेश आचरेकर यांनी काम पाहिले. स्पर्धेदरम्यान नाना नाईक आणि सुशील मोर्ये यांनी समालोचन केले.
यावेळी यतीन मालवणकर, दीपक ढोलम, लीलाधर झाड, मोहित झाड, समीर पाटकर, विकी फर्नांडिस, अनिल झाड, आनंद हडकर, संकेत वस्त, मंदार झाड, सिद्धेश केळुसकर, हर्षद हळदणकर, प्रथमेश पुरळकर, भूषण गरगटे, अनिश तळगावकर, सुशांत सुर्वे, रोहित चव्हाण, संदेश झाड यांच्यासह नागरिक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






