जिल्हा प्रशासनाचे आवाहन; मुदत चुकल्यास घरगुती दरातील सिलिंडर मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी (गॅस) ग्राहकांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया १६ ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील एलपीजी ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅस वितरकाशी संपर्क साधून अथवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी. यासाठी एचपीसीएल ग्राहकांनी HP Pay, बीपीसीएल ग्राहकांनी Hello BPCL, तर आयओसीएल ग्राहकांनी IndianOil ONE या अधिकृत ॲपचा वापर करावा.
विहित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास तेल विपणन कंपन्यांच्या नियमांनुसार ग्राहकांना घरगुती दराने एलपीजी सिलिंडरचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांनी १६ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.






