मालवण (प्रतिनिधी)
तोंडवळी येथील श्री देव वाघेश्वर मंदिर येथे पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री देव वाघेश्वर भक्त मंडळाच्या वतीने सोमवार, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता देखावायुक्त दिंडी नृत्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक म्हणून रोख १० हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी उर्वरित संघांना मानधन देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या भक्तिमय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा भजनप्रेमींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव वाघेश्वर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ९४०३९४७०१६, ९४२३८३३४८५, ९४०४१७२९५९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.






