मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दर्यासारंग हॉटेल येथे उत्साहात पार पडली. या सभेत ललित ढोलम यांची तालुका अध्यक्षपदी, तर चंद्रशेखर सुपल आणि राहुल कुलकर्णी यांची जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आली.
जिल्हा संघटनेच्या २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यासह मालवण तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. जिल्हा संघटनेच्या निर्देशानुसार निवडणूक निरीक्षक विवेक आपटे यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणाखाली निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी विद्यानंद परब, सचिवपदी विरेश येसाजी, खजिनदारपदी अमेय पारकर, सहसचिवपदी श्रुती गोलतकर, संघटन सचिवपदी अमित भोगले आणि सल्लागारपदी सुदेश आचरेकर यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विविध क्षेत्रांतून तसेच विविध संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.






