मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप जानू गोवेकर (६२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून राजकीय व सामाजिक क्षेत्रातूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दिलीप गोवेकर हे ग्रामपंचायत स्तरावर सक्रियपणे कार्यरत होते. गावातील विविध प्रश्न आणि विकासकामांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने गावाने एक कार्यकर्ते गमावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.






