मालवण | प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, पेंडूर येथील सुमित अरुण सावंत यांची भाजयुमोच्या मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजयुमो सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी सुमित सावंत यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले. सुमित सावंत यांच्या निवडीमुळे मालवण-ग्रामीण भागात भाजपची युवा संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीच्या बैठकीस भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, युवा मोर्चा सरचिटणीस संतोष पुजारे, जावेद खतीब, युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश रावराणे, राकेश सावंत, मालवणचे नगरसेवक ललित हरी चव्हाण, जिल्हा चिटणीस देवेंद्र शेटकर, कुडाळ युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, प्रसाद कृष्णा पाटकर, कुडाळ युवा अध्यक्ष तन्मय वालावलकर, मयूर राणे, विनेश तावडे, सावंतवाडी युवा अध्यक्ष हितेश नाईक, परेश कांबळी, सागर पवार, शुभम परब, कणकवली युवा अध्यक्ष सर्वेश दळवी, देवगड भाजप अध्यक्ष अतुल सरवटे, कणकवली भाजयुमो सरचिटणीस प्रशांत राणे, कणकवली शहराध्यक्ष सागर राणे, युवा तालुकाध्यक्ष सहदेव खाडे, नयन दळवी, बांदा युवा अध्यक्ष सिद्धेश कांबळी, पराशर सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमित सावंत यांच्या निवडीबद्दल भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






