मालवण | प्रतिनिधी
वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेच्या आवारात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून नारळाच्या रोपांची लागवड करण्यात आली.
या वृक्षारोपण कार्यक्रमात संस्थेचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू, मुख्याध्यापक टकले सर तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते नारळाच्या रोपांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमासाठी आवश्यक असलेले खत प्रफुल्ल माळकर यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. ते स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच रोप लागवडीसाठी उमेश मालपेकर, अजय सावंत, संजय सावंत आणि हनु पुजारे यांनी विशेष योगदान दिले.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शिक्षक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी कौतुक करत सर्व सहभागींचे अभिनंदन केले.






