नादुरुस्त रस्त्यांवरून सुरेश बापर्डेकर आक्रमक; नगरपरिषद प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप
मालवण | प्रतिनिधी
मालवण नगरपरिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शहरातील सर्व नादुरुस्त रस्त्यांचे १५ ऑगस्टपूर्वी दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता मालवण नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जागरूक नागरिक सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
बापर्डेकर यांनी भरड नाका–रांगोळी महाराज मार्ग, रांगोळी महाराज–वाघ पिंपळ मार्ग तसेच तानाजी नाका–आंबा नाका हे शहरातील प्रमुख रस्ते मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाल्याचे निदर्शनास आणले आहे. विशेषतः तानाजी नाका–आंबा नाका रस्ता सातत्याने पाठपुरावा करून तयार करण्यात आला होता. मात्र, गेल्या वर्षापासून या रस्त्याची झालेली दुरवस्था प्रशासनाने दुर्लक्षित केल्याचा आरोप त्यांनी केला.
संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागाची जबाबदारीच माहीत नसल्यासारखी परिस्थिती असल्याची टीका करत, दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करून खड्डे दाखवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. “प्रशासन अधिक पावसाची किंवा गणेशोत्सवाची वाट पाहत आहे काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नगरपरिषद प्रशासनाने केवळ वरवरची मलमपट्टी न करता दर्जेदार आणि टिकाऊ डांबरीकरण करावे. निकृष्ट दर्जाची कामे करून नागरिकांची दिशाभूल करू नये. अशा कामांमुळे काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडतात आणि नागरिकांचा त्रास वाढतो, असेही बापर्डेकर यांनी नमूद केले.
विशेषतः वाघ पिंपळ परिसरातील गतिरोधकाजवळ मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेत नसल्याने शहरातील रस्त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
१५ ऑगस्टपूर्वी सर्व प्रमुख रस्त्यांचे गुणवत्तापूर्ण डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा






