मालवण : प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ चा उद्घाटन सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्शांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप व धूप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. मालवण तालुका अध्यक्ष रविकांत कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रवचन मालिकेतील पहिल्या पुष्पात ‘विश्वगुरू तथागत भगवान बुद्ध’ या विषयावर तालुका उपाध्यक्ष तथा माजी श्रामणेर, बौद्धाचार्य नचिकेत पवार यांनी मार्गदर्शन केले. भगवान बुद्धांचा विशुद्धी मार्ग हा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असून, प्रज्ञा, समता, करुणा आणि शील या मूल्यांना जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
“मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आणि संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध हे विश्वाचे गुरु आहेत,” असे प्रतिपादन नचिकेत पवार यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला संस्कार सचिव मिलिंद पवार आणि तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी शुभेच्छा दिल्या. तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्कार विभाग सचिव योगेश वराडकर यांनी केले.
यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, संरक्षण कमांडर अरुण जाधव, जिल्हा महिला शाखा संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडूरकर, जिल्हा महिला शाखा संघटक लीना तळगावकर, तालुका महिला शाखा सरचिटणीस समता डिकवलकर, संस्कार सचिव मिलिंद पवार, तालुका संघटक भरत पेंडूरकर, तालुका प्रचार पर्यटन सचिव सचिन कासले, बार्टीचे समतादूत संग्राम कासले यांच्यासह विविध गाव शाखांचे पदाधिकारी, उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.






