मालवण | प्रतिनिधी
“लायन्स क्लब मालवण गेली अनेक वर्षे सातत्याने सामाजिक सेवेत अग्रेसर आहे. क्लबच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविल्याबद्दल सर्व सदस्यांचा मी ऋणी आहे. सर्वांच्या सहकार्याने सेवाकार्याचा विस्तार करून लायन्स क्लब मालवणचे नाव अधिक उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे प्रतिपादन लायन्स क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांनी केले.
लायन्स क्लब मालवणच्या २०२६-२७ वर्षाच्या नूतन संचालक मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवारी मालवण येथील दैवज्ञ भवनात उत्साहात पार पडला. लायन्स क्लब रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल सुनील सुतार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ दिली.
यावेळी अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर तसेच झोन चेअरमन अनुष्का चव्हाण यांच्यासह नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारला.
नूतन कार्यकारिणीत प्रथम उपाध्यक्ष मनाली दळवी, द्वितीय उपाध्यक्ष सचिन शारबिद्रे, तृतीय उपाध्यक्ष स्वप्नाली नेरुरकर, सहसचिव अंजली आचरेकर, सहखजिनदार मुकेश बावकर, टेल ट्विस्टर मीना घुर्ये, टेमर जयश्री हडकर, स्वच्छ भारत प्रमुख मिताली मोंडकर, मेंबरशिप चेअरमन मेघ:श्याम शंकरदास, एलसीआयएफ चेअरमन स्नेहा जामसंडेकर, पीआरओ दीक्षा गावंकर, जीएसटी चेअरमन फॅनी फर्नांडिस, जीएलटी चेअरमन पल्लवी खानोलकर, जीएमटी चेअरमन डॉ. हरीश परुळेकर, मिशन 1.5 प्रमुख श्वेता यादव, ॲक्टिव्हिटी चेअरमन नंदिनी गावंकर, हेल्थ अवेअरनेस वैशाली शंकरदास, लीडरशिप शाम नार्वेकर, साइट फर्स्ट डॉ. प्रिया रिवणकर, यूथ प्रोग्राम रूपा कांदळगांवकर, फंड रेझिंग ऋग्वेदा धामापूरकर, डायबेटीस अवेअरनेस डॉ. दर्शन खानोलकर, बुलेटिन एडिटर मनिषा गावंकर, रिलिव्हिंग हंगर विश्वास गावंकर आणि पर्मनंट प्रोजेक्ट महेश कारेकर यांच्यासह संचालक मंडळातील सदस्यांनीही शपथ घेतली.
यावेळी अन्वेषा आचरेकर, शेखर मोर्वेकर आणि सीए युगांत चव्हाण यांचे नवीन सदस्य म्हणून लायन्स क्लबमध्ये स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांनी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन (LCIF) साठी एक हजार अमेरिकन डॉलरची देणगी जाहीर केली. त्यांच्या या सेवाभावी निर्णयाचे उपस्थित सदस्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तसेच लायन्स क्लब सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी डॉ. निलेश पाटील आणि सुनील सुतार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सेवाभावाची परंपरा अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले. तर अनुष्का चव्हाण यांनी सर्वांच्या सहकार्याने आदर्श झोन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय घाटवळ आणि मिताली मोंडकर यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ लायन्स पदाधिकारी विजय जमदग्नी, केशव फाटक, अजित भणगे, मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेवक, जिल्हा परिषद सेवानिवृत्त अधिकारी राजेंद्र पराडकर, तसेच लायन्स क्लब, रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.







