मालवण, प्रतिनिधी :
सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब मालवणच्या वतीने मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देऊळवाडा येथील पहिली ते पाचवीच्या २७ विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोडकर, झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, जयश्री हडकर, रुजारिओ पिंटो, गणेश प्रभुलीकर, नंदिनी गावंकर, दीक्षा गावंकर, मनीषा गावंकर, फॅनी फर्नांडिस यांच्यासह क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता यादव, शिक्षिका अदिती ठाकूर आणि प्रांजल चव्हाण यांनी लायन्स क्लब मालवणच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले







