मालवण (प्रतिनिधी)
आचरा गावचे सुपुत्र तथा आचरा पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले तुकाराम पडवळ यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती मिळाली आहे. या बढतीबद्दल पडवळ यांचे आचरा गावासह पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
तुकाराम पडवळ यांनी यापूर्वी सावंतवाडी, कुडाळ, देवगड त्यानंतर मालवण तालुक्यात त्यांनी ३५ वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. पोलीस सेवेत त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. पोलीस दलात प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावत असलेल्या तुकाराम पडवळ यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे गावकऱ्यांकडून, नातेवाईकांकडून तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.







