मालवण (प्रतिनिधी)
मालवण येथील एस. टी. स्टँड परिसरात एस. टी. महामंडळ व वसुंधरा जनकल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. वराडकर तसेच उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनातील त्याची भूमिका तसेच वृक्षांचे मानवी जीवनासाठी असलेले विविध फायदे याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मालवण आगार व्यवस्थापक अनिरुद्ध शशिकांत सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सतीश शरद वाळके, लिपिक दिलीप हिंदळेकर वाहतूक नियंत्रक सुधाकर मालंडकर व अमित शंकरदास, प्रमुख कारागीर भिकाजीराव पळसंबकर, वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, सदस्य स्वप्नील मिटकर,ॲड. रत्नदीप कदम, हर्षल केळुसकर, निकित वराडकर, रमेश परब व अशोक बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रथमेश शैलेश काळसेकर, वयम फॉरेस्ट नर्सरी, काळसे यांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले.







