मालवण | प्रतिनिधी
लायन्स क्लब मालवणच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, अध्यक्षपदी सहदेव बापर्डेकर, सचिवपदी पुनम चव्हाण आणि खजिनदारपदी राधिका मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवार, १९ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मालवण येथील दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास लायन्स क्लबचे रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, माजी प्रांतपाल सुनील सुतार यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात येणार आहे.
नूतन कार्यकारिणीत मनाली दळवी (प्रथम उपाध्यक्ष), सचिन शारबिद्रे (द्वितीय उपाध्यक्ष), स्वप्नाली नेरुरकर (तृतीय उपाध्यक्ष), अंजली आचरेकर (सहसचिव), मुकेश बावकर (सहखजिनदार), मीना घुर्ये (टेल ट्विस्टर), जयश्री हडकर (टेमर), मिताली मोंडकर (स्वच्छ भारत), मेघा श्याम शंकरदास (मेंबरशिप चेअरमन), स्नेहा जामसंडेकर (एलसीआयएफ चेअरमन), दीक्षा गावंकर (पीआरओ), फॅनी फर्नांडिस (जीएसटी चेअरमन), पल्लवी खानोलकर (जीएलटी चेअरमन), डॉ. हरीश परुळेकर (जीएमटी चेअरमन), श्वेता यादव (कॅम्पेन 100), नंदिनी गावंकर (अॅक्टिव्हिटी चेअरमन), वैशाली शंकरदास (हेल्थ अवेअरनेस), शाम नार्वेकर (लीडरशिप), डॉ. प्रिया रिवणकर (साइट फर्स्ट), रूपा कांदळगांवकर (युथ प्रोग्राम), ऋग्वेदा धामापूरकर (फंड रेजिंग), डॉ. दर्शन खानोलकर (डायबेटीस अवेअरनेस), मनीषा गावंकर (बुलेटिन एडिटर), विश्वास गावंकर (रिलिव्हिंग हंगर) आणि महेश कारेकर (परमनंट प्रोजेक्ट) यांच्यासह विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
तसेच नाना साईल, महेश अंधारी (पीएमजेएफ), रुजारिओ पिंटो (एमजीएफ), उमेश नेरुरकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, गणेश प्रभुलकर, दत्ताराम रेवणकर, विराज आचरेकर, अरविंद सराफ, मोहन पटेल, उमेश शिरोडकर, अवधूत चव्हाण, शांती पटेल आणि उदय घाटवळ यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला असून त्यांनाही यावेळी शपथ दिली जाणार आहे.
लायन्स क्लब मालवणतर्फे आयोजित या शपथविधी व पदग्रहण सोहळ्यास सदस्य, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.







