मालवण (प्रतिनिधी) :
रोटरी क्लब मालवणच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी नीलम जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सचिवपदी प्रविणा शिंदे, तर खजिनदारपदी प्रदीप सामंत यांची निवड झाली आहे.
नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात होणार आहे. डिस्ट्रिक्ट ३१७०चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अविनाश पोतदार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार असून क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रो. अभिषेक माने प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास रोटरी क्लब मालवणचे सदस्य तसेच जिल्ह्यातील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी उमेश सांगोडकर, संयुक्त सचिवपदी तनिष्का कासवकर, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट पंकज पेडणेकर, क्लब सर्व्हिस – सुहास ओरसकर, कम्युनिटी सर्व्हिस – डॉ. लीना लिमये, व्होकेशनल सर्व्हिस – ऋषिकेश पेणकर, इंटरनॅशनल सर्व्हिस – डॉ. अजित लिमये, युथ सर्व्हिस – अभय कदम, रोटरी फाउंडेशन – प्रदीप जोशी, मेंबरशिप डेव्हलपमेंट – बाळू तारी, क्लब ॲडमिन – महादेव पाटकर, क्लब बुलेटिन – सुविधा तिनईकर, सार्जंट ॲट आर्म्स – कमलिनी प्रभू, स्पोर्ट्स चेअरमन – अमेय पारकर, क्लब ट्रेनर – भाऊ साळगावकर, लिटरसी प्रमोशन – रमाकांत वाक्कर आणि क्लब फेलोशिप – उमेश हळदणकर यांची निवड करण्यात आली आहे.






