मालवण, दि. (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून चिंदर गावातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाला शिवसेना आचरा विभागप्रमुख संतोष कोदे, मंगेश गावकर, मनोज हडकर, भाऊ हडकर, दत्ता वराडकर, अजित साटम, शशिकांत नाटेकर, सागर परुळेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शाळांचे शिक्षक उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करण्याचे आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.







