ओरोस : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीची नवी जिल्हा कार्यकारिणी तसेच आठही तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या ओरोस येथे जाहीर करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली.
नव्या कार्यकारिणीत मेघनाद धुरी, नागेश मौर्ये, विजय प्रभू, वासुदेव नाईक, आतिष जेठे आणि अनिल डेगवेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंदार शिरसाठ यांच्याकडे जिल्हा कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
जिल्हा सरचिटणीसपदी देवानंद लुडबे, राजेंद्र मसुरकर, चंद्रशेखर जोशी, डॉ. विवेक रायकर, रवींद्र म्हापसेकर, कृष्णा धाऊसकर, विधाता सावंत, प्रवीण वरुणकर आणि केतनकुमार गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा सचिवपदी संदेश कोयंडे, सुभाष दळवी, ॲड. राजन यादव, शांताराम नेवरेकर, सौ. अमिदी मेस्त्री, सज्जाउद्दीन सोलकर, चंद्रसेन सावंत, संतोष गावकर आणि ॲड. गुरुनाथ आईर यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा सदस्य म्हणून विद्याप्रसाद बांदेकर, सुमेधा सावंत, प्रकाश डिचोलकर, तौकीर शेख, सुभाष सावंत, विजय खाडये, नंदकिशोर दळवी, मधुकर लुडबे आणि सौ. स्नेहल मेथर यांचा समावेश करण्यात आला आहे.
तालुकाध्यक्षपदी देवगडसाठी उमेश कुलकर्णी, कणकवलीसाठी प्रदीप मांजरेकर, वैभववाडीसाठी भालचंद्र जाधव, मालवणसाठी जेम्स फर्नांडिस, कुडाळसाठी अभय शिरसाठ, सावंतवाडीसाठी अभय मालवणकर, वेंगुर्ल्यासाठी वैभव वेंगुर्लेकर आणि दोडामार्गसाठी गुणाजी गवस यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, ज्येष्ठ नेते प्रकाश जैतापकर, विलास गावडे यांच्यासह मेघनाद धुरी, आतिष जेठे, डॉ. विवेक रायकर, अनिल डेगवेकर, देवानंद लुडबे, राजेंद्र मसुरकर, रवींद्र म्हापसेकर, विधाता सावंत, प्रवीण वरुणकर, केतनकुमार गावडे, प्रदीप मांजरेकर, जेम्स फर्नांडिस, भालचंद्र जाधव, अभय मालवणकर तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ही कार्यकारिणी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी व्यक्त केला.







