मालवण दि प्रतिनिधी
विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी ए सो हायस्कुलचा विद्यार्थी कुमार नागेंद्र युवराज तारी याने 244 गुण मिळवत गुणवत्ता यादीत 35 वा क्रमांक तर रेणुका गुरुनाथ चव्हाण हिने 236 गुण मिळवत 49 वा क्रमांक प्राप्त केला.
या विद्यार्थ्यांना श्रीमती पी जी मेस्त्री, सौ. ए ए वाईरकर , सौ एस पी बांदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर मुख्याध्यापक एच बी तिवले, तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले आहे .







