मालवण (प्रतिनिधी)
मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघांचे आमदार निलेश राणे यांनी दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे मालवण तालुक्याची आमसभा आयोजित केली आहे. या सभेत तालुक्यातील विकासकामे तसेच जनतेच्या विविध समस्या व प्रश्नांवर चर्चा होऊन निवारण केले जाणार आहे. तरी या आमसभेस तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध खात्याचे अधिकारी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड यांनी केले आहे.







