मालवण : (प्रतिनिधी)
मालवण धुरीवाडा येथील हर्षदा सुनील धुरी (वय २४) हिचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
हर्षदा धुरी ही चित्रकलेत पारंगत होती. तीच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. तिच्यावर धुरीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तिच्या पश्चात आई, वडील, काका, काकी असा परिवार आहे. धुरीवाडा येथील पिठाच्या गिरणीचे मालक सुनील धुरी यांची ती कन्या होय.







