मालवण दि प्रतिनिधी
अक्षय तृतियेचे औचित्य साधून ‘अनाम प्रेम परिवार’तर्फे अंध व दृष्टिबाधित बांधवांसाठी ‘अक्षय तृतीया २०२६’ हा राष्ट्रीय मेळावा मालवण येथे आयोजित करण्यात आला असून हा मेळावा १७ ते १९ एप्रिल या कालावधीत कुंभारसाठ, मालवण येथील हॉटेल जानकी येथे होणार आहे. या मेळाव्या निमित्ताने आज टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर झालेल्या दृष्टिबाधित मुलांचे क्रिकेट स्पर्धेत खेड इलेव्हन संघाने रत्नागिरी इलेव्हन संघाचा अटीतटीच्या लढतीत ६ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकाविले. मालवणात प्रथमच रंगलेल्या या सामन्यात आम्ही कमी नाही हा आत्मविश्वास अंध बांधवाच्या चेहऱ्यावर झळकत होता
या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण भारतीय संघातील माजी कसोटी क्रिकेटपटू पांडूरंग साळगावकर यांच्या उपस्थितीत व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहाय्य महेश सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग स्नेही उत्तमकुमार जैन जेष्ठ पत्रकार शेखर सामंत, नगराध्यक्ष ममता वराडकर, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, रवी वाघ, मिलींद अवसरे, जयंत गवंडे, प्रेरणा मेस्त्री, एलिझा पिंन्टो, संदीप खानोलकर, प्रशांत भाट, संजना मेस्त्री, तृप्ती, सिद्धेश वैद्य, राजेश सोहनी, भुषण पिसे, वैभव, नंदिनी, मोना, भारती, अजय मुनी आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही डोळ्यांनी अंध असतानाही मैदानावरील फटक्यांच्या आवाजाने ते कोणत्या ठिकाणी चेंडू गेला यावर थेट समालोचन करताना दिसून आले. तसेच याशी या तृतीयपंथी यांनीही उत्कृष्टपणे समालोचन केले होते.
या स्पर्धेत पुणे, रत्नागिरी, खेड येथील संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पंच म्हणून ऑब्रोज आल्मेडा आणि दिपक धुरी हे होते. गुणलेखन ज्ञानेश यांनी केले. समालोचन रवी वाघ यांनी केले. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून अल्ताब पटेल, अभिजीत शिरतोंडे, गौरव झबडे यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी अंध बांधवासाठी काम करणाऱ्या मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष लुडबे यांचाही सत्कार करण्यात आला






