मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथून चौकेच्या दिशेने जाणाऱ्या डबलसीट असलेल्या दुचाकीस्वाराने समोरील डंपरला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता समोरून येणाऱ्या वाहनामुळे दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार चंद्रकांत यशवंत चव्हाण ( वय ४०) (रा. चौके नादरुख) हा डंपर खाली सापडून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना
चौके धनगराचा गोठा येथे आज रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला त्याचा मेव्हणा महादेव पांडुरंग लाड (वय ३४) (रा. रांगणा तुळसुली सध्या राहणार चौके)हा जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार चौके नांदरुख परिसरात राहणारा चंद्रकांत यशवंत चव्हाण हा तरुण नेहमीप्रमाणे दुचाकी एक्टिवा ( MH07 AD1633) द्वारे आपला मेव्हणा याच्यासोबत कामावरून नांदरुख येथे घराच्या दिशेने येत असताना अगदी घराच्या काही अंतरावर असलेल्या मालवण कसाल मार्गावर चौके धनगराचा गोठा येथे डंपरला (MH07X 0666) ओव्हरटेक करत असताना अपघात होऊन डंपर खाली गेल्याने जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. सोबत असलेला मेव्हणा याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी चौके रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची खबर मिळतात चौके ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली.अपघातात मृत्युमुखी पावलेला चंद्रकांत हा गरीब कुटुंबातील विवाहित युवक सेंट्रींग चे कामे करायचा शांत स्वभाव व सर्वत्र परिचित असा होता. त्याच्या पश्चात पत्नी शिक्षण घेणाऱ्या दोन मुली एक मुलगा असा परिवार असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मालवण पोलीस घटनास्थळी येत पुढील पंचनामाची कारवाई चालू आहे.







