मालवण दि प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती चौके ग्रामपंचायतीच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी चौके गावचे सरपंच पी. के. चौकेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या गौरवशाली जीवनावर आणि त्यांच्या सामाजिक क्रांतीवर प्रकाश टाकला.
या सोहळ्याला ग्रामपंचायत अधिकारी श्री. निकम, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, विशाखा चौकेकर, जयश्री कदम, लिपिक सुविधा गावडे, मेघा वराडकर, कर्मचारी आनंद सावंत, दीपक चौकेकर, गोपाळ मांजरेकर, गुरुप्रसाद गावडे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सौ. गावडे यांनी केले. मेघा वराडकर यांनी आभार मानले.







